महाअपडेट टीम :- हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याच्या बातम्यांवरून हेलिकॉप्टर खरोखरच कोसळलं आहे की काय अशी भीती वाटू लागली आहे. का तुम्ही दलांचे प्रमुख हेलिकॉप्टरमध्ये होते म्हणून काही कटकारस्थान केलंय का ? हा अपघात नसून कट असल्याचा आरोप माजी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केला.

आमचे तीन लष्करप्रमुख ज्या हेलिकॉप्टरमधून होते ते एडव्हान्स हेलिकॉप्टर आहे, जे इतक्या सहजासहजी कोसळू शकत नाही. सावंत म्हणाले की, हा अपघात ज्या भागात झाला तो LTT चा आहे.

आजही तिथे स्लीपर सेल अँक्टिव्ह आहे.माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्याही तामिळनाडूतच झाली होती. या अपघाताचा तपास NIA कडून व्हायला हवा. जेणेकरून हा अपघात आहे की नाही हे सत्य समोर यायला हवं.

भारतीय वायुसेनेचे (IAF Mi-17V5) हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. देशाचे चीफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत हे देखील हेलिकॉप्टर होते. या अपघातात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तर इतरांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

गंभीर जखमी अवस्थेत (CDS) बिपिन रावत यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं . अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एलएस लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, एनके गुरसेवक सिंग, एनके जितेंद्र कुमार, एल/नायक विवेक कुमार, एल/नायक बी साई तेजा, हवालदार सतपाल यांचा समावेश आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *